पौड : मुळशी तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव तसेच वाढते रूग्ण लक्षात घेता तालुक्यात होणाऱ्या क्रिकेट स्पर्धा तसेच गाव पातळीवर गर्दी करणाऱ्या कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे.
देशात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली आहे. रूग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राञी ९ ते सकाळी पाच वाजेपर्यंत कर्फ्यु लावण्यात आलेला आहे. माञ दिवसा अनेक गावामध्ये क्रिकेट स्पर्धा सुरू असून या स्पर्धाना मोठ्या प्रमाणात युवक गर्दी करत आहेत तसेच अनेक गावामध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून गर्दी होत आहे.
सध्या तालुक्यात तिसऱ्या लाटेचा विचार करता रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. पाच पेक्षा जास्त नागरिकांनी एकञ जमू नये.तसेच क्रिकेट स्पर्धा,राजकीय कार्यक्रम,किर्तनाचे कार्यक्रम तसेच इतर गर्दीचे कार्यक्रम आढळले तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे.
musaHoump
can priligy cure pe <a href="https://apriligyn.com/">can you buy priligy in usa</a> Kamagra En Mujeres