logo
add image
add image
Blog single photo

आई कडून दोन चिमकूल्यांचा खून : खून प्रकरणी आईला अटक


पौड : मुळशी धरण परिसरातील शिरवली येथे आईनेच आपल्या  दोन चिमूकल्यांचे रस्सीने गळा घोटून खून केल्याची घटना घडली आहे.

        पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरवली येथील कॅप्रीकाँन होम अँन्ड डेव्हल्पर्स लेबरकँम्प येथे संजय जगन्नाथ सोलंकी ( वय २५ वर्षे ) आणि त्यांची पत्नी पुना संजय सोलंकी ( वय २४ वर्ष)  कॅप्रीकाँन होम अँन्ड डेव्हल्पर्स लेबरकँम्प शिरवली ता. मुळशी, मुळ राहणार-ग्राम मेरीखेडा तहसील हरसोद जिल्हा खांडवा राज्य मध्यप्रदेश ) येथे मजूरी करून राहात होते.पूना सोलंकी हि चंदा संजय सोलंकी  ( वय ३ वर्षे ६ महिने, व मुलगा आनंद संजय सोलंकी ( वय २ वर्षे) या त्याच्या लहान मुलांना सतत मारहाण करत आसायची.यांचा कारणावरून रागाच्या भरात तिने दोन्ही मुलांचा शिरवली ( ता.मुळशी ) येथील कॅप्रीकाॅन होम ॲन्ड डेव्हल्पर्स साईटवर रस्सीने गळा आवळुन दोघांचा खुन करून त्यांचे प्रेत झाडीत गवतात टाकुन निघुन गेली आहे.या प्रकरणी संजय जगन्नाथ सोलंकी यांनी फिर्याद दाखल केली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांनी घटना स्थळाला भेट दिली असून पुढील पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ हे करीत आहेत.

add image
add image

Leave Comments

Top