logo
add image
add image
Blog single photo

अभिजित ऊर्फ सोन्या पवार खून प्रकरणी तीन आरोपींना अटक


पौड : बेलावडे येथील कातकरी वस्ती येथे झालेल्या अभिजित ऊर्फ सोन्या पवार ( वय.अंदाजे ३०) याच्या खून प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात पौड पोलिसांना यश आले आहे.

     या खून प्रकरणी राजेंद्र महादेव महाडिक ( वय: ३८ वर्ष), आशिष विनायक महाडिक ( वय:37 वर्ष),संदीप शंकर महाडिक (वय:२७ वर्ष  तिघेही  राहणार  बेलावडे,ता .मुळशी,जि पुणे )  या आरोपीना पौड शिताफीने ताब्यात घेतले आहे.गडदावणे - गवळीवाडा येथे हे तीन आरोपी असल्याची माहिती पोलिस हवालदार संदीप सपकाळ यांना मिळाली असता त्यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक  अशोक धुमाळ यांना घटनेची माहिती दिली.सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलिस हवालदार संदीप सपकाळ ,पोलिस नाईक रॉकी देवकाते, नामदेव मोरे, साहिल शेख या टीम ने गडदावणे - गवळीवाडा या ठिकाणी डोंगर भागात आरोपीचा शोध घेतला असता आरोपी मिळून आले 

        सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे ,पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले,पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे,पोलिस हवालदार संदीप सपकाळ ,पोलिस नाईक रॉकी देवकाते,नामदेव मोरे,साहिल शेख यांनी केली.

add image
add image

Leave Comments

Top