logo
add image
add image
Blog single photo

बेलावडे कातकरी वस्ती तरूणाची निर्घण हत्या


पौड : मुळशी तालुक्यातील कोंढावळे गावातील अभिजित उर्फ सोन्या वामन पवार ( वय.अंदाजे ३०) या तरुणाची बेलावडे गावातील कातकरी वस्तीवर निघृणपणे हत्या करण्यात आली आहे. 

       सदर घटना हि बेलावडे जवळील तलावाशेजारील कातकरी वस्ती येथे झाली.मारेकय्रानी सोन्या याच्या तोंडावर अनेक वार केले होते.हत्येनंतर कातकरी वस्तीवरील सर्व आदिवासी समाजातील  नागरिक घाबरून आपल्या घरातील सर्व माणसे घेऊन निघून गेले. या प्रकरणातील मुख्य आरोपी व त्याच्या दोन साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत.या घटनेचा तपास पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे व पोलिस हवालदार संदीप सकपाळ हे करीत आहे.शवविच्छेदनासाठी मृतदेह पौड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला होता.

add image
add image

Leave Comments

Top