पौड : नांदे ( ता.मुळशी ) येथील विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी पौड पोलिसांत पतीसह चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सौ.रोहिणी उर्फ रोमा तेजस मरकड ( वय- २२ वर्षे ) हिने नांदे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी रोहिणीचे वडील जर्नादन रामचंद्र साठे ( वय- ४३ वर्षे , हिरासनगर, पिरंगुट, ता.मुळशी, मूळ रा.कुळे,ता.मुळशी ) यांनी फिर्याद दाखल केली असून सासरा अशोक एकनाथ मरकड ,सासू विजया अशोक मरकड, नवरा तेजस अशोक मकरड ( सर्व रा.नांदे,ता.मुळशी ) आणि नणंद किर्ती केशव चेमटे ( रा.तळेगाव दाभाडे,ता. मावळ,जि.पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहिणी हिला सर्व आरोपी संगनमत करून शुल्लक कारणावरून हाताने मारहाण करून शिवीगाळ करत,घालुन पाडुन बोलत. तिचा मानसिक व शारिरीक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणी चारही आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रोहिणी हिने शनिवार ( दि.२७) रोजी राञी अकराच्या दरम्यान राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रोहिणी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पौड ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला होता.पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव अधिक तपास करीत आहेत.