logo
add image
add image
Blog single photo

आदरवाडी ते डोंगरवाडी दरम्यान वाहनांच्या लांबच लांब रांगा


पौड : कोकणातून सुट्टी संपवून परतणाय्रा पर्यटकांची पुणे कोलाड महामार्गावर मोठी गर्दी झालेली होती.रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान आदरवाडी ते डोंगरवाडी दरम्यान दोन ते तीन किलोमीटर लांब पर्यत वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या.

        दिवाळी आणि शनिवार व रविवार अशा जोडून आलेल्या सुट्यामुळे अनेक हौशी पर्यटकांनी फिरण्यासाठी कोकणाकडे धाव घेतली. पुण्यातून कोकणात जाण्या येण्यासाठी पौड - ताम्हिणी घाटमार्गे जवळचा रस्ता पडत असून नुकताच रस्ता अनेक ठिकाणी चांगला तयार झालेला असल्यामुळे पर्यटक कोकणात जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करत आहेत.

         माञ रविवारी कोकणातून पुण्याकडे येण्यासाठी सुट्टी संपवून निघालेल्या पर्यटकांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. खराब रस्ता तसेच हुल्लडबाज वाहनचालकांमुळे आदरवाडी ते डोंगरवाडी दरम्यान दोन ते तीन किलोमीटर पर्यंत लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या होत्या. तर पौड,घोटावडे फाटा, पिरंगूट आणि भुगांव येथे वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या.

add image
add image

Leave Comments

Top