logo
add image
add image
Blog single photo

अबंडवेट येथील गवळीवाडा येथे घरातून ३,८०,००० रूपये किंमतीचा १८ किलो गांजा जप्त


पौड : मुळशी तालुक्यातील अबंडवेट येथील गवळीवाडा येथे प्रकाश वाघोजी खेडेकर याच्या घरी पोलिसांना तीन लाख ऐंशी हजार रूपये किंमतीचा १८ किलो गांजा मिळून आला असून त्याच्याच शेतातून २५० झाडे मिळून आलेली असून या गाजांच्या झाडांची किमंत सात लाख एक्काहत्तर हजार रूपये ऐवढी असून सदर आरोपीला ताब्यात घेण्यात आलेले असून या कारवाई मुळे मुळशी तालुक्यात खळबळ उडाली आहे.

              पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विरोधी पथक, पुणे शहर यांनी कोथरूड पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी चेतन मारुती मोहोळ (रा. कोथरूड ) याने सांगितले की, त्याच्याकडे असलेला गांजा तो गवळीवाडा - अंबडवेट( तालुका मुळशी) पुणे येथून घेऊन येत. सदर ठिकाणी आमली विरोधी पथक तसेच पौड पोलीस स्टेशनचे पथक असे जाऊन कारवाई केली असता आरोपी प्रकाश वाघोजी खेडेकर ( वय ३५ वर्षे रा. गवळीवाडा, अंबडवेट, तालुका मुळशी )  याच्या राहते घरी १८ किलो गांजा किमंत ३,८०,००० त्याचबरोबर त्याच्या शेतामधून २५० गांजाची झाडे वजन १५५ किलो अंदाजे किंमत ७ लाख ७१ हजार असे मिळून आले असून कायदेशीर कारवाई सुरू आहे.

       सदरची कारवाई ही अमली विरोधी पथकचे  प्रकाश खांडेकर, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सपोनि लक्षण डेंगळे, पोलीस उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण व त्यांच्या पोलीस पथक तसेच पौड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलीस उपनिरीक्षक मृगदीप गायकवाड,एएसआया राजेंद्र शितोळे,सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक संतोष कुंभार, नितिन रावते व पौड पोलिस स्टेशनचे पथक यांनी केली असून कारवाई सुरु आहे.

add image
add image

Leave Comments

Top