logo
add image
add image
Blog single photo

बैलपोळा सण पारंपरिक व साध्यापणाने साजरा करावा.


पौड : बैलपोळा सण पारंपरिक व साध्यापणाने साजरा करावा. शासनाने घालून दिलेल्या नियम व अटींचे पालन करावे, असे आवाहन पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले आहे.

            बळीराजाचा आवडता सण म्हणजे बैलपोळा. मुळशी तालुक्यात बुधवार (ता. ६) रोजी हा सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र कोरोनाची पार्श्वभूमी पाहता हा सण पारंपरिक पध्दतीने पण शांततेत साजरा करावा. तसेच नियम व अटींचे पालन करावे. अन्यथा संबंधितांवर गुन्हे दाखल होणार आहे.

           बैलपोळा सणानिमित्त बैलांची मिरवणूक काढू नये. ढोल  - ताशा, हलगी, झांज पथक, वाद्य पथक, डीजे लावू नये. तसेच गुलाल उधळून फटाके वाजवू नये. नियमांचे पालन न केल्यास संबंधित व्यक्तींवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी दिला आहे.

add image
add image

Leave Comments

Top