logo
add image
add image
Blog single photo

भुगावमध्ये अवैद्य गुटखा वाहतूक करणारा वाहनासह जेरबंद


भूगाव:  स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीणचे पथक पौड पोलिस स्टेशन परीसरात पेट्रोलिंग करीत असताना पोलिस नाईक बाळासाहेब खडके यांना गोपनीय खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की, भुगाव  गावचे हद्दीत बालाजी ट्रेडिंग कं नावाचे किराणा दुकान चा व्यवसाय करणारा इसम  मंगलराम भवरलाल चोधरी (वय ४२ वर्ष रा. पिरंगुट ता. मुळशी जि. पुणे) हा आपले ताब्यातील निळे रंगाची हुंडाई कंपनी ची  i10 गाडीचे डिकीमध्ये विमल कंपनीचा प्रतिबंधीत असलेला गुटख्याची अवैध वाहतूक करीत आहे.

             त्यानुसार चांदणी चौक ते पिरंगुट रोडवर भुगाव येथे  स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व पौड पो स्टे कडील पोसई श्रीकांत जाधव व पो ना जगदाळे यांचे मदतीने भुगाव येथे सापळा लावून इसम नामे मंगलराम भवरलाल चोधरी वय ४२ वर्ष रा. पिरंगुट ता. मुळशी जि. पुणे यास ताब्यात घेउन त्याचे गाडीचे डिकीची पाहणी केली असता त्या मध्ये २२८८०/- रु चा विमल कंपनीचा प्रतिबंधीत गुटखा व हुंडाई कंपनी i10 गाडी, मोबाईल फोन, रोख रक्कम  असा २,३३,८८०/- (दोन लाख तेहतीस हजार अष्टशे ऐशी) मिळून आला. म्हणून सदर इसम व  माल पंचनाम्याने जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी पौड पोलीस स्टेशन यांचे ताब्यात दिले आहे. 

        सदरची कार्यवाही ही मा.पोलीस अधीक्षक सो पुणे ग्रामीण डॉ. अभिनव देशमुख  मा.पोलीस निरीक्षक श्री अशोक धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि रामेश्वर धोंडगे, पोउपनि श्रीकांत जाधव पौड, सफौ.दत्तात्रय जगताप, पो ना निवास जगदाळे, पो.ना.बाळासाहेब खडके यांनी केली आहे.

add image
add image

Leave Comments

Top