logo
add image
add image
Blog single photo

पौड पोलिसांकडून राञीच्या नाकाबंदी दरम्यान सराईत चोरास अटक


पौड : पौड पोलिसांकडून राञीच्या नाकाबंदी दरम्यान पळून जाणाऱ्या दोघांना पाठलाग करून अटक केली असता त्यांच्याकडून भुगावं येथील माताळवाडी येथे घरफोडी करून हजारो रूपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

        याप्रकरणी पौड पोलिसांनी, मयुर भाऊ बवले आणि बाजीराव महेश अवताडे ( दोघेही रा.बाणेर,पुणे) यांना अटक करण्यात आली असून पौड पोलिस स्टेशन हद्दीत सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, सहाय्यक फौजदार बाबा कदम, पोलिस नाईक चंद्रशेखर हगवणे हे राञीची गस्त घालत असताना दोन इसम संशयापदरित्या फिरताना दिसले.  त्यांना हटकले असता ते दोघेही लवळेफाटा बाजूला पळून गेल्याने त्यांचावरील संशय अधिकच बळावला. पुढे राञीची गस्त करीत असलेल्या पोलिस अमंलदार व डिबी पथकाने नाकाबंदी केली.यामध्ये मयुर बवले व बाजीराव अवताडे यांना पकडण्यात आले. त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली.सखोल चौकशी नंतर भुगांव येथील माताळवाडी येथे बंद घराचा कडी,कोयंडा तोडून घरफोडी करून सोन्या चांदीचे हजारो रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल.

        सदर कारवाई पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील,वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, सहाय्यक फौजदार बाबा कदम, महिला पोलिस हवालदार अनिता रवळेकर,पोलिस नाईक राँकी देवकाते, सिध्देश पाटील,चंद्रशेखर हगवणे,पोलिस काँन्स्टेबल राजेश गायकवाड,साहिल शेख या पथकाने केली आहे.

add image
add image

Leave Comments

Top