logo
add image
add image
Blog single photo

पौड पोलिस स्टेशन हद्दीतून ३९ इसम हद्दपार


पौड : गणपती विसर्जन शांततेत पार पडावे याकरिता पौड पोलिस स्टेशन हद्दीतून ३९ इसमांना उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या आदेशावरून हद्दपार करण्यात आले असल्याची माहिती पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे.

       पौड पोलिस स्टेशन हद्दीत गणपती विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी या हेतूने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४(२) अन्वये चांदीवली,आंग्रेवाडी,भुकूम, भुगांव,कोळावडे, दासवे,कातवडी, खाटपेवाडी, आंबवणे, नांदे,लवळे, घोटावडे, आंदगांव,माले , हाडशी,पिरंगूट या गावातील ३९ इसमांना हद्दपार करण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या प्रस्तावावरून हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांनी केली आहे.

add image
add image

Leave Comments

Top