पौड : पौड पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण दिनामध्ये १४४ तक्रारदार यांच्या तक्रारीचे निवारण करण्यात आले.
पौड पोलीस स्टेशन हद्दीत आज मा. पोलीस अधीक्षक डाँ.अभिनव देशमुख पुणे ग्रामीण यांचे आवेशान्वये हवेली उप विभागीय पोलीस अधिकारी डाँ. सई भोरे पाटील यांच्या उपस्थितीत पंचायत समिती येथील सेनापती बापट सभागृहात तक्रार निवारण दिन आयोजीत करण्यात आला होता. सदर तक्रार दिना निमित्त पोलीस स्टेशन हद्दीतील अर्जदार व गैर अर्जदार यांच्या सक्रारी समक्ष ऐकुण घेऊन १४४ तक्रारदार यांचे तक्रारीचे निवारण करण्यात आले आहे.
पोलिसांनी आयोजित केलेल्या तक्रार निवारण दिनानिमित्त अनेक वाद विवाद सामापोचाराने मिटले. यासाठी गावातील पोलिस पाटील, बीट अमंलदार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.तक्रारदारांचा वेळ व पैसा वाचल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले असल्याचे पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर,पवन चौधरी, भालचंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलिस हवालदार संदीप सकपाळ, अनिता रवळेकर तसेच इतर बीटचे अमंलदारही उपस्थित होते.