logo
add image
add image
Blog single photo

पौड पोलिस स्टेशन येथे उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन


पौड : ज्या नागरिकांनी पोलिस अधिक्षक कार्यालय, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय,अप्पर पोलिस अधिक्षक कार्यालय, पोलिस महासंचालक कार्यालय,पौड पोलिस ठाणे, आपले सरकार किंवा इतर वरिष्ठ अधिकारी यांच्या कार्यालयात तक्रारी अर्ज केलेले आहेत.त्या सर्वाच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी  मा.पोलिस अधिक्षक यांच्या आदेशान्वये गुरूवार दि ९/९/२०२१ रोजी सकाळी दहा वाजता पौड पोलिस स्टेशन येथे तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सर्व तक्रारदार यांनी पौड पोलिस ठाणे येथे उपस्थित राहावे असे आवाहन पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले आहे.

        तक्रारदार यांच्या तक्रारीचे निवारण करण्याबाबत जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन यांना आदेश देण्यात आलेले आहेत.यानुसार पौड पोलिस स्टेशन येथेही तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आलेले असून पोलिस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारी संबंधित अर्जदार,गैर अर्जदार यांना समक्ष बोलावून त्यांच्या तक्रार अर्जातील तक्रारीवर त्वरित निर्णय घेऊन  पुढील कारवाई करण्यात येणार आहे.संबंधित तक्रारदार यांनी गुरूवार दि ९/९/२०२१ रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहावे. सदर तक्रार निवारण दिनाला हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील या भेट देणार आहेत.तसेच पौड पोलिस स्टेशनचे सर्व अधिकारी,बिट अमंलदार व कर्मचारी यावेळी उपस्थित राहणार असून तक्रारदारांच्या तक्रारींचे जागच्या जागी निराकरण केले जाणार आहे.

           जास्तीत जास्त तक्रारदार यांनी  उद्या उपस्थित राहून आपल्या तक्रारीचा ताबडतोब निपटारा करून घ्यावा असे आवाहन पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले आहे.

add image
add image

Leave Comments

Top