logo
add image
add image
Blog single photo

घोटावडे येथे भावकीतील पाच जणांना बेदम मारहाण,एकाच मृत्यू


पिरंगूट : घोटावडे ( ता.मुळशी ) येथे असलेल्या लांडगेवाडी येथे गाय आमच्या शेतात का बांधली या कारणावरून सख्ख्या चुलत भावामध्ये शनिवार ( दि.२८) सकाळी मारामारी झालेली असून यामध्ये महादेव लांडगे, त्यांचे वडील गुलाब बाबू लांडगे, आई मुक्ताबाई लांडगे,बायको सुरेखा लांडगे,मुलगा वैभव लांडगे यांना बेदम मारहाण करण्यात आली होती.यामध्ये आई मुक्ताबाई लांडगे यांचा मृत्यू झाला आहे.

        महादेव यांचे चुलत भाऊ दत्ता लांडगे,प्रविण लांडगे आणि त्यांची आई सुमन लांडगे यांनी काठ्या,कोयता व कुह्राडीने हा हल्ला केला होता. 

घटनेची माहिती मिळताच पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ,सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर,शिवसेना समन्वयक प्रकाश भेगडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे,भाजपाचे रामचंद्र देवकर,पोलिस पाटील दिपक मातेरे, भेगडेवाडीचे पोलिस पाटील सुनिल माकर, पोलिस हवालदार सुनिल मगर अनिता रवळेकर, सुधीर होळकर, राँकी देवकाते, चंद्रशेखर हगवणे,साहिल शेख यांनी घटनास्थळावर धाव घेतली. हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांनी  घटना स्थळाला भेट देऊन पाहणी केली.

add image
add image

Leave Comments

Top