पौड : पौड ( ता.मुळशी ) येथील जिल्हा परिषदत अंतर्गत असलेल्या एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असणार्या महिलेस ३ हजार ४५० रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. सीमा विद्याधर विपट (वय ४७, कनिष्ठ लिपिक, एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्प (जिल्हा परिषद अंतर्गत),पौड ता. मुळशी) असे लाच घेणार्या महिलेचे नाव आहे. त्याच्याबाबत एका २६ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर आज सापळा रचण्यात आला. पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, अप्पर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक श्रीहरी पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली आहे. पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.