पौड : पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांना विशेष पदकाने गौरविण्यात आल्याबद्दल तसेच पौड पोलिस स्टेशनमधील अनेक पोलिसांची पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचा मुळशी तालुका पञकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
गेली १५ वर्ष पोलिस दलात उत्कृष्ट सेवा बजाविल्याबद्दल पोलिस महासंचालकांनी पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांना विशेष सेवा पदकाने सन्मानित केले.तर उपमुख्यमंत्री तथा पालकमंञी अजित पवार, गृहमंञी दिलीप वळसे पाटील, पोलिस अधिक्षक डाँ.अभिनव देशमुख यांच्या हस्तेही अशोक धुमाळ यांना सन्मानित करण्यात आले. तसेच बाबासाहेब कदम,संजय सुपे, नितीन गार्डी,प्रशांत देसाई,रविंद्र नागटिळक,रविंद्र जाधव,चंद्रकांत सोनवणे,सिध्देश्वर पाटील,ईश्वर काळे या पोलिस कर्मचाऱ्यांची नुकतीच पदोन्नती झाली याबद्दल या सर्वांचा मुळशी तालुका पञकार संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला.
यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझीरे, खजिनदार दिपक सोनवणे,सचिव विजय वरखडे ,सदस्य गोरख माझीरे,बंडू दातीर, प्रवीण सातव, भुकूमचे माजी आदर्श सरपंच नामदेव अण्णा माझीरे , मुळशी तालुका हॉटेल आणि बार असोसिएशनचे अध्यक्ष माऊली सातपुते, पौडचे सरपंच जगदिश लांडगे,शिवसेना समन्वयक दिपक करंजावणे, कासारआंबोलीचे माजी सरपंच गणेश सुतार, तुषार अमराळे ,नितीन अमराळे, नानेगावचे माजी सरपंच यशवंत गायकवाड,प्रविण साठे,शेरेचे पोलिस पाटील सुरेश तिकोने, भूगाव व्यापारी संघटनेचे अनिल चोंधे, विजय उनेचा, भूकुम व्यापारी संघटनेचे अनिल माझीरे उपस्थित होते.
१) एक वर्षापूर्वी पिरंगूट मध्ये पहीला कोरोनाचा रूग्ण सापडला. सुरूवातीच्या काळात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते.कठिण काळात अधिकारी,कर्मचारी व नागरिकांनी तालुका कोरोनामुक्त राहण्यासाठी प्रयत्न केले. वाईक काळात लोकच लोकांच्या मदतीला आले.गावपातळीवर सरपंच,पोलिस पाटील,ग्रामसेवक,ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी चांगले काम केले यामुळे तालुक्यात होणारा कोरोनाचा शिरकाव रोखण्यात प्रशासनाला यश आले असल्याचे सत्कारावेळी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.
२) भुकूमचे माजी आदर्श सरपंच नामदेव आण्णा माझिरे यांनी कोरोनाच्या काळामध्ये पौड पोलीस ठाणे, हिंजवडी आणि वारजे पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना एक महिनाभर अल्पोपहार स्वतः दिला त्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी त्यांचे आभार मानले.