पौड : पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी कोविड काळात केलेल्या कामगिरीबद्दल गृहमंञी दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज सन्मानित करण्यात आले. यावेळी पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख हेही उपस्थित होते.
पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी मुळशी तालुक्यात कोरोना प्रसार फोफावू नये म्हणून नाकाबंदी तसेच गस्तीपथके तयार केली होती. तालुक्यातील राजकीय,सांस्कृतिक,सामाजिक कार्यात सहभाग घेताना सर्वाशी प्रेमाने व स्नेहाने वागत ऋणानुबंध निर्माण केले होते. पौड पोलिस स्टेशनला ISO 9001 पुरस्कानेही सन्मानित करण्यात आले होते. तसेच पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांना केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल पोलिस महासंचालक पदाकाने सन्मानित करण्यात आले.