मुळशी : मुळशी धरण पाणलोट क्षेत्रात काल देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून ताम्हीणी परिसरात २४ तासात ५१४ मीमी पावसाची नोंद झाली आहे. धरणामध्ये गेल्या २४ तासांत ऐतिहासीक अशा ८० दलघमी (म्हणजेच २.८३ अघफू/टिएमसी) आवक नोंद झाली आहे. धरण जलाशय पातळीत ७ फूटाने वाढ झाली आहे. तर धरणाचा आज रोजीचा साठा २९६.१२ दलघमी असून टक्केवारी ५१.८८% आहे.