logo
add image
add image
Blog single photo

पुणे - कोलाड महामार्गावरील वारक - चाचिवली दरम्यानची दरड हटवली


मुळशी : मुळशी धरण परिसरात वारक - चाचिवली दरम्यान अतिवृष्टीमुळे रस्त्यावर पडलेली दरड दूर करण्यात यश आले आहे.मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांनी तातडीने हि दरड दूर करण्यासाठी कार्यवाही करण्यात आली आहे.

       मुळशी धरण भागात राञीपासून ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू आहे. याचा फटका धरण भागाच्या दोन्ही बाजूला असलेल्या रस्त्यांना बसला आहे.वळणे आंबवणे रस्ता बंद झालेला असताना केंद्रीय महामार्ग असलेल्या पुणे कोलाड महामार्गावर वारक ते चाचिवली दरम्यान दरड रस्त्यावर येऊन पडून महामार्गावरील वाहतूक बंद झाली होती.

       मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांनी तातडीने कार्यवाही करत सदर दरड दूर करण्यात प्रशासनाला यश आले असून येथील वाहतूक हळूहळू सुरू करण्यात आली आहे.

add image
add image

Leave Comments

Top