logo
add image
add image
Blog single photo

वळणे पुढील रस्ता वाहतुकीस बंद, अनेक ठिकाणी रस्ता गेला वाहून


मुळशी : मुळशी धरण भागात राञभर झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे वळणे पुढील मुख्य रस्ता अनेक ठिकाणी वाहून गेला असून मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दगड,माती वाहून आली आहे.यामुळे वळणे येथून पुढील वाहतूक बंद झालेली आहे.

       बुधवारी राञभर मुळशी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस सुरू असून याचा फटका मुळशी धरण परिसरात मोठ्या प्रमाणावर बसला आहे.वळणे, शेडाणी, नांदिवली, कुंभेरी, पोमगांव येथे अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाणी वाहत असून पाण्याच्या लोंढ्यामुळे सगळा रस्ताच वळणे व नांदिवली या ठिकाणी वाहून गेला आहे. वळणे येथून पुढे जाणारा रस्ताच बंद झाल्याने पुढील गावांना दळणवळणचा प्रश्न उभा राहणार आहे.

        वळणे येथे असलेला धबधब्याखालील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने हा रस्ता वाहून गेला असून रस्त्यावर आता दगड व माती वाहून आलेले असून रस्ता पूर्ववत करण्याचे काम ग्रामस्थ करत आहेत. महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना तात्काळ माहिती दिले असून शेती आणि रस्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या भागाची पाहणी करून शासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी माजी सभापती कोमल गणेश वाशिवले आणि वळणेचे सरपंच समीर सातपुते यांनी केली आहे.

add image
add image

Leave Comments

Top