logo
add image
add image
Blog single photo

मुळशीत पर्यटकांकडून ८५०००/- रूपयांचा दंड वसूल


पौड : मुळशी तालुक्यात शनिवार आणि रविवार पौड पोलिसांनी १७० जणांवर कारवाई करत ८५०००/- रूपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अशोक धुमाळ यांनी दिली आहे.

         मुळशी तालुक्यात पर्यटन बंदी असतानाही व जमाव बंदीचे १४४ कलम लागू करण्यात आलेले असतानाही मुळशी धरणाकडे जाण्यासाठी पौडमध्ये आजही वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या.पौड येथील शासकीय गोदाम येथे पौड पोलिसांनी केलेल्या नाकांबदी दरम्यान मोठी गर्दी झालेली होती.

        पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पवन चौधरी, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे, संतोष कुंभार, राजेंद्र शितोळे, पोलिस हवालदार संदीप सकपाळ, नितीन गार्डी,पंढरीनाथ कामथे, पोलिस नाईक आनंदा बाठे, चंद्रशेखर हगवणे, पोलिस शिपाई तुषार भोईटे,प्रशांत बुनगे,सुहास सातपुते, अक्षय नलावडे, साहिल शेख,राजेंद्र गायकवाड, होमगार्ड मरकड, शेडगे, वीर यांनी पौड,रावडे फाटा, मुठा खिंड, पळसे धबधबा या ठिकाणी बंदोबस्त केला.

add image
add image

Leave Comments

Top