logo
add image
add image
Blog single photo

पौड येथे पोलिसांची नाकाबंदी


पौड : मुळशी तालुक्यात पर्यटन बंदी असतानाही व जमाव बंदीचे १४४ कलम लागू करण्यात आलेले असतानाही मुळशी धरणाकडे जाण्यासाठी पौडमध्ये वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या होत्या.पौड येथील शासकीय गोदाम येथे पौड पोलिसांनी केलेल्या नाकांबदी पासून पौड गावच्या बसस्थानकापुढे वाहनांची रांग गेली होती.

       कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुळशी तालुक्यात पर्यटनस्थळी कलम १४४ लागू करण्यात आले असून पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकञ येण्यास मज्जाव करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डाँ.राजेश देशमुख यांनी हा आदेश दिला आहे.मुळशी धरण,पळसे धबधबा, पिंपरी दरी पाँईट, तसेच इतर ठिकाणी पर्यटनासाठी बंदी घालण्यात आलेली असतानाही पर्यटक याभागात मोठ्या संख्येने येत आहेत.

    पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पवन चौधरी, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सचिन शिंदे, राजेंद्र शितोळे, पोलिस हवालदार संदीप सकपाळ, पंढरीनाथ कामथे, पोलिस नाईक आनंदा बाठे, चंद्रशेखर हगवणे, पोलिस शिपाई तुषार भोईटे, अक्षय नलावडे, साहिल शेख,राजेंद्र गायकवाड, होमगार्ड मरकड, शेडगे, वीर यांनी पौड,रावडे फाटा, मुठा खिंड, पळसे धबधबा या ठिकाणी बंदोबस्त केला.

add image
add image

Leave Comments

Top