पौड : मुळशी तालुक्यातील घोटावडे फाटा परिसरातील कंपनीला आग लागून १७ जणांचा मृत्यू झाला.यातील पीडित कुटुंबातील भविष्यात उपजिविकेचा प्रश्न मिटणे गरजेचे आहे. आगीच्या झालेल्या घटनेमुळे मुळशी तालुक्यावर राज्याचे लक्ष्य आहे.मिळालेल्या निधीचा संबंधित कुटुंबानी योग्य वापर करणे गरजेचे असून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मिळालेल्या निधीसाठी मदत कक्ष उभारावा तसेच मयताचा मुलगा किंवा मुलगी भविष्यात शिकावे म्हणून हा निधी देण्यात आला असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेच्या उपसभापती डाँ. निलम गोह्रे यांनी पौड येथे केले.
मुळशी तालुक्यातील उरवडे येथील एसव्हीएस ॲक्वा कंपनी जळीत दुर्घटनेतील बाधितांना राज्य शासनाने जाहिर केलेल्या प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या मदतनिधीचे वाटप विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत मुळशी पंचायत समितीच्या सेनापती बापट सभागृहात करण्यात आली आहे.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे, प्रांत अधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार अभय चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, पोलीस निरिक्षक अशोक धुमाळ,गटविकास अधिकारी संदीप जठार, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गंगाराम मोतेरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, शिवसेना महिला आघाडीच्या स्वाती ढमाले, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे,युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे,नायब तहसिलदार भगवान पाटील,सरिता पाटील, युवा नेते मधुर दाभाडे,दादाराम मांडेकर,माऊली कांबळे,नामदेव टेमघरे, दिपक करंजावणे,हनुमंत सुर्वे,ज्ञानेश्वर डफळ,शिवाजी बलकवडे,राहूल जाधव आणि विविध मान्यवर उपस्थित होते.
घोटावडे फाटा येथील एसव्हीएस ॲक्वा कंपनीतील दुर्दैवी घटनेत १५ महिला व २ पुरुषांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीय वारसदारांना राज्य शासनाचे प्रति मयत व्यक्ती ५ लाख रुपये मदत जाहिर केली होती. तसेच जखमी झालेल्या कामगारांना प्रत्येकी १२ हजार पाचशे रुपये तर वाळेण येथे ओढ्यात बुडलेल्या मृतांच्या वारसदार तसेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील लाभार्थी असे एकूण ८९ लाख ६५ हजार रूपयांचे आज वाटप करण्यात आले.
राज्य शासनाच्या मदतीसाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी लक्ष दिले. तसेच विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे व आमदार संग्राम थोपटे यांनी देखील यासाठी पाठपुरावा केला. पुणे जिल्हाधिकारी डाँ. राजेश देशमुख, प्रांतधिकारी संदेश शिर्के, तहसिलदार अभय चव्हाण यांनी देखील कागदपत्रांच्या पुर्ततेत तत्परता आणून कार्यवाही केली.
पिरंगूट परिसरातील औद्योगिक वसाहतीला मुलभूत गरजा पुरविणे गरजेचे आहे.मुळशी तालुक्यात व्यवसाय,पर्यटन आणि कंपनी यावरच उदरनिर्वाह चालत असतो. घडलेली घटना दुःखदच आहे. राज्य शासनाच्या वतीने सर्वांनी भेटी दिल्या. राज्य शासनाकडे पाच लाख रूपयांची मागणी केली होती. राज्य शासनानेही एक महिन्यातच हा निधी मृताच्या नातेवाईकांना सुपूर्त केला आहे.असे मत आमदार संग्राम थोपटे यांनी यावेळी व्यक्त केले.