logo
add image
add image
Blog single photo

पौड मध्ये एकाला एक पिस्टल व एक जिवंत काडतुसासह अटक


पौड :   पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने आज पौड एसटी स्टँड परिसरात कारवाई करत एकाला एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतुसासह अटक केली आहे.याप्रकरणी सागर लक्ष्मण शिंदे (वय २९  रा. काशीग ता.मुळशी) यांस ताब्यात घेतले आहे असून त्याच्याकडून ३५ हजार शंभर रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

            पौड पोलीस स्टेशन हद्दीत रेकॉर्ड वरील फरारी आरोपीचा शोध घेत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने पौड एसटी स्टँड परिसरात सापळा लावून थांबले होते. येथे संशयास्पद हालचाली वरून आरोपी सागर शिंदे यांस ताब्यात घेतले. त्याच्याकडे विनापरवाना व बेकायदेशीरपणे कमरेला एक गावठी पिस्टल  व एक जिवंत काडतुस असा मुद्देमाल आढळला. हे पिस्टल कुठून आणले याबाबत त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने रेकॉर्ड वरील आरोपी खंडू कालेकर (रा. काले कॉलनी, पवनानगर ता.मावळ ) याने मागील दोन महिन्यांपूर्वी सदर पिस्टल ठेवायला दिले असल्याचे कबूल केले. यावरून खंडू कालेकर याचा शोध घेतला असता तो सध्या लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये नोंद असलेल्या गुन्ह्यात येरवडा जेलमध्ये असल्याची पोलिसांना खातरजमा झाली. त्यामुळे सदरचा जप्त मुद्देमाल व आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी पौड पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिलेलं आहे.

              सदर आरोपीपैकी आरोपी खंडू कालेकर हा सराईत असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीसुद्धा अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोन व इतर दोन असे एकूण ४ गुन्हे दाखल आहेत.

           पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक फौजदर दत्तात्रय जगताप, सहाय्यक फौजदर सुनील जावळे, सहाय्यक फौजदर शब्बीर पठाण, पोलीस हवालदार प्रकाश वाघमारे, मुकुंद आयचीत, प्रमोद नवले, सचिन गायकवाड यांनी हि कारवाई  केलेली आहे. सदर आरोपीला पौड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पौड पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

add image
add image

Leave Comments

Top