पिरंगूट : भुगाव येथील माताळवाडी येथे दाजीकडूनच मेव्हण्यांचा खून झाल्याची घटना घडली असून याप्रकरणी पौड पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माताळवाडी येथे आरोपी सचिन सुभाष जगताप ( वय.३७) हे आपल्या परिवारासमवेत राहात होते. त्यांचा मेव्हणा सोमा ऊर्फ अजय मोहन मरसाळे ( वय.२३, रा श्रीरामपूर, जि.पुणे ) हा त्यांच्याकडेच राहायला होता. आरोपी सचिन हा बायकोला मारहाण करत असायचा.त्यावेळी सोमा हा नेहमी मध्ये पडायचा. मयत सोमा हा दाजी सचिनकडे रागात बघायचा. यावेळी त्यांच्यातही शाब्दिक भांडणे व्हायची. आज सकाळी सचिन जगताप याने कपडे कापायच्या काञीने आपलाचा मेव्हणा सोमा याच्यावर वार केला. यामध्ये सोमा जखमी झाला. त्याला खाजगी दवाखान्यात नेत असताना त्याचा मृत्यू झाला.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अमृत देशमुख हे करीत असून पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, मृगदीप गायकवाड, पोलिस हवालदार संदीप सकपाळ, अनिता रवळेकर या पथकाने आरोपीला पकडले.