logo
add image
add image
Blog single photo

पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांचा सेवा पदकाने गौरव


पौड : पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांचा गृह विभागाच्या वतीने कायदा क्षेत्रात १५ वर्ष उत्तम सेवा केल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा पालकमंञी अजित पवार यांच्या हस्ते विशेष पदकाने गौरविण्यात आले आहे.

         पौड पोलिस स्टेशन गेली २८ महिने कार्यभार पाहताना पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी तालुक्यात दहशत असलेल्या ६ टोळ्यांवर मोक्काची कारवाई केली आहे.तसेच कुख्यात गजानन मारणे याला पकडून एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. तसेच झालेल्या काही खूनातील आरोपींना मोठ्या शिताफीने पकडण्यासाठी उपाययोजना केलेल्या होत्या.

              पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी तालुक्यातील राजकीय,सांस्कृतिक,सामाजिक कार्यात सहभाग घेताना सर्वाशी प्रेमाने व स्नेहाने वागत ऋणानुबंध निर्माण केले.पौड पोलिस स्टेशनला ISO 9001 पुरस्कानेही सन्मानित करण्यात त्यानी विशेष भुमिका बजावली. पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल विशेष पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी गृहमंञी दिलीप वळसे पाटील, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी डाँ.राजेश देशमुख, अपर पोलिस अधिक्षक विवेक पाटील उपस्थित होते.


add image
add image

Leave Comments

Top