logo
add image
add image
Blog single photo

पर्यटनासाठी आलेल्या ११२ जणांकडून ५६ हजार रूपयाचा दंड वसूल


पौड : पौड पोलिस स्टेशन हद्दीतील मुठा आणि पौड या ठिकाणी नाकाबंदी करून वर्षा विहारासाठी ताम्हिणी घाट व इतर परिसरामध्ये येणाऱ्या ११२ पर्यटकांवर कारवाई करून ५६०००/- रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.

      कोरोनामुळे जिल्ह्यात पर्यटनबदी आहे. तरीही हौशी पर्यटक पर्यटनासाठी मुळशी तालुक्यात येत असून पौड पोलिसांकडून मुठा खिंड व पौड शासकीय गोदाम येथे नाकाबंदी करण्यात आली आहे. यामध्ये ११२ पर्यटकांवर पोलिसांनी कारवाई करत ५६ हजार रूपयांचा दंड वसूल केला आहे.तसेच लवासा, पळसे, सहारा सिटी या ठिकाणी पौड पोलिसांकडून पेट्रोलिंग नेमण्यात आलेले होते.

add image
add image

Leave Comments

Top