logo
add image
add image
Blog single photo

ताम्हिणी वनपरिक्षेञात पर्यटनास बंदी, उल्लघंन केल्यास कारवाई होणार


मुळशी : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी पुणे तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, पुणे यांनी मुळशी तालुक्यातील मुळशी धरण, टेमघर धरण, ताम्हिणी घाट, पळसे धबधबा, पिंपरी पॉईंट, अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, सहारा सिटी, लवासा सिटी, गिरीवन व पर्यटन परिसरामध्ये पर्यटनाला जाण्यासाठी बंदी करण्यात आली असल्याची माहिती ताम्हिणी परिक्षेञ अधिकारी अंकिता तरडे यांनी दिली आहे.

             ताम्हिणी घाटामध्ये मुळशी धरण, ताम्हिणी घाट, पळसे धबधबा, पिंपरी पॉईंट, अंधारबन ट्रेक, प्लस व्हॅली, सहारा सिटी, या पर्यटन स्थळांचा समावेश होतो. आपत्ती व्यवस्थापन कायद्याने या पर्यटन ठिकाणी फिरण्यास प्रतिबंध करणेत आलेला होता.तरीही शनिवार व रविवार तसेच इतर सुट्टीच्या दिवशी काही हौशी पर्यटक या ठिकाणी सर्व शासकीय नियमांचे उल्लंघन करून व कोरोना प्रतिबंधित नियमांचे उल्लंघन करून पर्यटन स्थळे पर्यटनासाठी खुली करणेत आलेली आहेत किंवा कसे याबाबत खात्री न करता या ठिकाणी पर्यटनासाठी आलेली होती. सदर पर्यटन स्थळे हि वनविभागाच्या हद्दीत येत असून सर्व पर्यटन स्थळांना संरक्षित/राखीव वनांचे सर्व नियम लागू होतात. या ठिकाणी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील कलम ३०(२) (३) (४), भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८, भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) (ड) या कायद्यांचे उल्लंघन केलेले आहे.

             अशा पर्यटकांवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) (ड) अन्वये कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई राहुल पाटील, उपवनसंरक्षक पुणे वनविभाग, पुणे व मयूर बोठे सहा. वनसंरक्षक, पुणे वनविभाग पुणे यांचे मार्गदर्शनाखाली ताम्हिणी वनपरिक्षेञ अधिकारी अंकिता दिलीप तरडे, ताम्हिणी वनपाल मिरुलाल सोनवणे, आंबवणे वनपाल संजय अहिरराव, पिंपरी वनपाल योगिता नायकवाडी, पिंपरी वनरक्षक गोकुळ गवळी , एकोले वनरक्षक अभिनंदन सोनकांबळे, सालतर वनरक्षक उल्हास मोरे, विसाघर वनरक्षक संगीता कल्याणकर, ताम्हिणी वनरक्षक पांडुरंग भिकने, आंबवणे वनरक्षक साईनाथ खटके,आडगाव वनरक्षक संजीव कांबळे यांच्या कडून सदरची कारवाई करण्यात आली. पर्यटकांनी शासनाचे सर्व नियम पाळून शासनास सहकार्य करावे, असे आवाहन या वेळी वनविभागाकडून पर्यटकांना करण्यात आले. 






add image
add image

Leave Comments

Top