पौड : पर्यटन बंदीचा आदेश असतानाही मुळशी तालुक्यात फिरायला आलेल्या ५५ जणांवर आज पौड पोलिसांनी कारवाई केली असून त्यांच्याकडून २७,५०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने पर्यटन बंदी ठेवण्यात आली आहे. यात कोरोना रूग्ण वाढू नये म्हणून विशेष काळजी घेण्यात येत आहे. पाऊस सुरू झाल्याने लावासा तसेच मुळशी धरण भागात धबधबे आदळू लागली असून पर्यटकांची पावले नेहमी प्रमाणे इकडे वळली आहे. जिल्हाधिकारी तसेच तहसिलदार यांच्या आदेशाचे पालन करत पौड पोलिसांनी मुठा खिंड व पौड शासकीय गोदाम येथे नाकाबंदी केली. यात विनामास्क फिरणारे २५ जण तर विनाकारण फिरणारे ३० जण अशा ५५ जणांकडून २७,५००/- रूपयांचा आज दंड आकारण्यात आला आहे.
आजची कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, भालचंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, सहाय्यक फौजदार सचिन शिंदे, पोलिस हवालदार सुनील मगर, पोलिस काँन्स्टेबल संदीप सकपाळ, तुषार भोईटे, पोलिस नाईक नितीन गार्डी, जय पवार, विजय कांबळे, प्रशांत बुणगे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश सांळुके, होमगार्ड पवार आणि वाँर्डन बाँय शफीक तांबोळी यांनी केली.