logo
add image
add image
Blog single photo

पर्यटकांनो खबरदार ...! मुळशीत याल तर होऊ शकते कारवाई


पौड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुळशी तालुक्यात फिरायला येण्यास पर्यटकांना बंदी असून येणाऱ्या पर्यटकांवर कारवाई करण्यात येईल असा आदेश मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांनी दिला आहे.

       मुळशी तालुक्यात शनिवारी घोटावडे फाटा, मुठा खिंड, पौड शासकीय गोदाम या ठिकाणी पौड पोलिसांनी नाका बंदी केली होती. यामध्ये ५० वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्याकडून २५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे शहाराला जवळ असणाऱ्या मुळशी तालुक्यात लावासा, अँम्बी व्हँली, कोळवण खोरे,मुळशी धरण तसेच ताम्हिणी घाट या परिसरात फिरण्यासाठी पर्यटक पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर येत असतात. 

       माञ मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला अनुसरून मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांनी मुळशी तालुक्यात पर्यटन बंदीचा आदेश काढला असून यामध्ये फिरायला येणाऱ्या पर्यटकांवर थेट रोख स्वरूपात किंवा गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

         आज पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर,भालचंद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत जाधव, पोलिस काँन्स्टेबल तुषार भोईटे यांनी नाकांबदी केली होती.

         मुळशी तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावासा रोडवर मुठा खिंड येथे तर मुळशी धरण रस्त्यावर पौड येथे पौड तसेच भुगांव येथे पोलिसांची नाकाबंदी असून पर्यटकांनी या भागात फिरायला येऊ नये अन्यथा त्यांच्या दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी माहिती पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे.

add image
add image

Leave Comments

Top