पौड : पिरगुट ( ता.मुळशी) परिसरातील एसव्हीएस ॲक्वा टँक्नाँलाँजी कंपनीला आग लागुन खारावडे येथील धनगरवस्ती वरील सुमन संजय ढेबे, मंगल बबन मरगळे या दोघींचा मृत्यू झाला होता. या दोन्ही कुटुंबियांची खारावडे येथे घरी जाऊन विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोह्रे यांनी भेट घेऊन सांत्वन केले आहे.
उपसभापती निलम गोह्रे यांच्याशी चर्चा करत असताना दोन्ही कुटुंबातील लहान - लहान मुले व नातेवाईकांनी रडून हांबरडा फोडला. मुले लहान असल्यामुळे आमची आई कधी येणार ते अजुनही विचारत आहे. दोन्हीही कुटुंबाचे हातावर पोट होते. व त्या मध्ये आता घरातील करत्या महिलांचा मुत्यु झाल्यामुळे त्यांचा संसारच उध्वस्त झाला आहे.
मुत्युमुखी पडलेल्या महिलांच्या मुलाची शिक्षणाची जबाबदारी शासनाने घेवुन, त्या मुलांना नोकरीला लावावे अशी मागणी येथील सर्व ग्रामस्थ नातेवाईकांनी केले आहे. विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे त्यांनी या कुटुंबातील सदस्य माऊली ढेबे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोंनवरुन संपर्क साधून दिला. तसेच या कुटुंबाला पुढे काहीही मदत लागल्यास करणार असल्याचे सांगितले.
यावेळी ढेबे व मरगळे दोन्ही कुटुंबांना विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोह्रे व शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्या वतीने प्रत्येकी पंचवीस हजाराचे रोख स्वरुपात मदत केली. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघाचे संपर्क प्रमुख सत्यवान उभे, जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे, युवासेना जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे, महिला जिल्हा संघटिका संगिता पवळे, तालुका प्रमुख सचिन खैरे, युवा सेना तालुका अधिकारी संतोष तोंडे, भोर विधान सभा समन्वयक कैलास मारणे, शिवसहकार सेनेचे ज्ञानेश्वर डफळ,उपतालुका प्रमुख शिवाजी उभे,तालुका संघटक अमित कुडले , दत्ताभाऊ झोरे उपस्थित होते.