logo
add image
add image
Blog single photo

उरवडे रोडवरील सँनिटायझर कंपनीला मोठी आग. १६ महिला अडकल्याची भिती



पौड : घोटावडे फाट्या जवळील उरवडे रोड येथे एसव्हीएस या सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीत प्रचंड मोठी आग लागल्याची घटना घडली असून या आगीमुळे कंपनीत १६ मजूर अडकल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यात महिलांची संख्या जास्त असल्याचे निदर्शनास येत असून फायरब्रिगेडच्या ३ गाड्यांसह आग विझवण्याचे प्रयत्न चालू आहे. 

          पिरंगुट एमआयडीसीमध्ये अनेक छोट्या मोठ्या कंपन्या आहेत. हजारो कामगार येथे कामाला येत असतात. अशा परिस्थितीत उरवडे स्थित एस व्ही एस अक्वॉ कंपनीत आज मोठी दुर्घटना घडली. दुपारी अचानक लागलेल्या आगीमध्ये कंपनीचे १५-२० मजूर यामध्ये महिला मजूर जास्त असून ते अडकून पडले आहेत. त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळी तहसिलदार अभय चव्हाण आणि पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी लागलीच धाव घेतली आहे.


add image
add image
  • Blog single photo
    2021-06-07 13:44:06

    narayan palve

    👍

  • Blog single photo
    2021-06-07 13:44:09

    narayan palve

    👍

Leave Comments

Top