पिरंगूट : भुगांव ( ता.मुळशी ) येथे असलेले विजयकुमार उणेचा यांच्या मालकीचे श्री साई सेवा मेडीहेल्थ केअर सेंटर शासनाच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांच्याकडून सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भुगांव येथील श्री साई सेवा मेडीहेल्थचे मालक व चालक यांना सर्व अटी व नियम माहिती असूनही शनिवारी सकाळी १२ वाजण्याच्या दरम्यान दुकानामध्ये ग्राहकांना प्रवेश देऊन सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडवत विना मास्क ग्राहकांची गर्दी केली. श्री साई मेडीहेल्थ केअर सेंटर वारंवार नियमाचे उल्लंघन करून नागरिकांच्या जिवास धोका निर्माण करत आहेत. यामुळे राज्य शासनाचा लाँकडाऊन संपेपर्यत श्री साई मेडीहेल्थ केअर सेंटर बंद करून संबंधिताकडून दंडाची रक्कमही वसूल करावी असा आदेश मुळशीचे तहसिलदार अभय चव्हाण यांनी दिले आहेत.
मुळशी तालुक्यात सध्या कडक लाँकडाऊनची अमंलबजावणी सुरू आहे.माञ काही मेडिकल चालक औषधाच्या नावाखाली इतरही वस्तूची विक्री करत असल्याचे निदर्शनास आले असून त्यांनी फक्त ओषधांचीच विक्री करावी.अन्यथा अशा मेडिकलधारकांवर बंदची कारवाई यापुढे करण्यात येऊ शकते असे पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले.