logo
add image
add image
Blog single photo

मुकाईवाडीमध्ये सापडला अनोळखी पुरुषाचा मृतदेह


पिरंगुट : पौड पोलिस स्टेशन हद्दीतील मूकाई वाडी येथील उरवडे रोड लगत एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला असून त्याबाबत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. 

  सदर अनोळखी पुरुषाचे वय अंदाजे 35 ते 40 वर्ष, उंची अंदाजे पाच फूट, अंगामध्ये लालसर रंगाचा हाफ बाहयांचा गोल गळ्याचा टी-शर्ट व नाईट पॅन्ट घातलेली असा इसम हा मयत अवस्थेत मिळून आलेला असून त्याचे डोक्यात कशाने तरी आघात केलेला आहे.  त्याचे पँट मधील उजवे खिशात स्वयंपाक करताना डोक्याला लावायचे हेड कॅप सापडली आहे यावरुन तो इसम आचारी/स्वयंपाकी/कुक असण्याची शक्यता आहे.  आपले जवळील हॉटेल, खानावळ, चायनीज सेंटर, रिसॉर्ट, हॉस्टेल अथवा हा राहत असलेल्या ठिकाणची तसेच सदर  इसमाबाबत काही माहिती असल्यास तत्काळ पौड पोलिस स्टेशन येथे अथवा आम्हाला मोबाईल नंबर 9822689034 यावर माहिती द्यावी. असे आवाहन पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी केले आहे. 

add image
add image

Leave Comments

Top