logo
add image
add image
Blog single photo

मुकाईवाडी येथे आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह


पिरंगुट, दि. १५ (वार्ताहर) - मुकाईवाडी (ता. मुळशी) येथे एक अनोळखी पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. याबाबत पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
             याबाबत पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी पौड पोलिस स्टेशन हद्दीतील मुकाईवाडी येथील उरवडे रोड लगत  अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला आहे. मृताचे अंदाजे वय 35 ते 40 वर्ष आहे. उंची अंदाजे पाच फूट आहे. अंगामध्ये लालसर रंगाचा हाफ बाहयांचा गोल गळ्याचा टी-शर्ट व नाईट पॅन्ट घातलेली आहे. त्याच्या डोक्यात कशाने तरी आघात केलेला आहे तसेच त्याचे पँट मधील उजवे खिशात स्वयंपाक करताना डोक्याला लावायचे हेड कॅप सापडली आहे. तो इसम आचारी/स्वयंपाकी/कुक असण्याची शक्यता आहे.
         सदर व्यक्तीबाबत काही माहिती असल्यास तत्काळ पौड पोलिस स्टेशन येथे अथवा ९८२२६८९०३४ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केले आहे.

add image
add image

Leave Comments

Top