पिरंगूट : शिवसेनेचे नेते व प्रसिद्ध उद्योजक माधवराव ऊर्फ आबासाहेब शेळके यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने पौड पोलीस व पत्रकार बांधवांना कोरोना प्रतिबंधक किटचे वाटप करण्यात आले.
उद्योजक माधवराव शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त मुळशी तालुक्यात दरवर्षी विविध प्रकारचे उपक्रम साजरे केले जातात. परंतु सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक जाणिवेतून आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून समाजाच्या सुरक्षेसाठी जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस मित्रांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंडळाच्या वतीने मासस्क, सॅनिटायझर व खाऊ अशा प्रकारचे साहित्य पोलीस व पत्रकार बांधवांना देऊन अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी पौड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक देवकर,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे, माधवराव शेळके,पोलिस नाईक संजय सुपे, जय पवार, प्रकाश भेगडे, संतोष मोहोळ, तालुकाप्रमुख सचिन खैरे, ज्ञानेश्वर डफळ, पोपटराव ववले ,शाकीर शेख, शुभम शेळके, श्रीकांत क्षीरसागर व आबासाहेब शेळके मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.