logo
add image
add image
Blog single photo

पौडचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांना गृहविभागाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर


पौड : पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांना कायदा सुव्यवस्था क्षेत्रात सतत १५ वर्ष उत्तम सेवा केल्याबद्दल महाराष्ट्र शासन गृहविभागाच्या वतीने विशेष राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.पोलिस महासंचालक यांच्या हस्ते अशोक धुमाळ यांचा गौरव चिन्ह देऊन सन्मान केला जाणार आहे.

        गेली दोन वर्ष मुळशी तालुक्यात आपले कर्तव्य बजाविताना त्यांनी कायदा सुव्यवस्था राखली आहे. दोन वर्षाच्या काळात मुळशी तालुक्यात सहा गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का लावत पन्नास पेक्षा जास्त समाजात दहशत असलेल्या गुन्हेगारांना जेलमध्ये पाठविले असून कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्यावरही नुकत्याच झालेल्या प्रतिबंधक कारवाईमध्ये अशोक धुमाळ यांनी महत्त्वाची भुमिका बजावली असून मिळालेल्या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल मुळशी तालुक्यातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

add image
add image

Leave Comments

Top