पौड : मुळशी तालुक्यातील चाले गावचे हद्दीत वळकी नदीमध्ये निलेश जयवंत दहीभाते (रा.चाले, ता.मुळशी ) व विशाल उर्फ भैय्या किसन पिसे ( रा.पिसे वस्ती ता.दौंड ) असे दोघे जण संगमताने जेसीबी चे साह्याने कोरड्या नदीचे पात्रात बिगर परवाना वाळू उत्खनन करून विक्री करीत आहेत अशी बातमी मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व पौड पोलिसांचे पथक दिनांक १०/०४/२०२१ रोजी संध्याकाळी वळकी नदीचे दोन्ही बाजूनी जाऊन धाड टाकली असता अंधाराचा फायदा घेऊन वाळू उपसा करणारे इसम पळून गेले. परंतु सदर ठिकाणी १जेसीबी,२जॉन डिअर कंपनीचे ट्रॅक्टर,२ ट्रॅक व १ स्कॉर्पिओ जीप असा एकूण ६५,००,०००/-(पासष्ठ लाख) रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन मा.तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार मुळशी अभय चव्हाण यांना ताब्यात देण्यात आले होते.
दिनांक १२/०४/२०२१ रोजी मा.तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार अभय चव्हाण यांनी सदर वाहनांवर एकूण ३४,००,०००/- (चौतीस लाख) रु चा दंड आकारला आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थनिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट,पौड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक धुमाळ,पोसई रामेश्वर धोंडगे, अमोल गोरे,सहा पोलीस उप-निरीक्षक दत्तात्रय जगताप,राजेंद्र थोरात, पोलिस कॉन्स्टेबल अमोल शेडगे,मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय जावळे व पौड पोलिस स्टेशनचे हवालदार रावते,पोलिस नाईक संजय सुपे,विजय कांबळे यांच्या पथकाने केली आहे.मा.पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांचे आदेशानुसार पुणे ग्रामीण जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.