पौड : पौड पोलीस स्टेशन हद्दीत मास्क न घालता फिरणाऱ्या ३६ नागरिकांवर कारवाई करण्यात आलेली असून त्यांच्याकडून १८००० रुपये दंड वसूल केला आहे तसेच सार्वजनिक ठिकाणी थुंकणे अशा २ व्यक्तीवर कारवाई करून त्यांच्याकडून २००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या नियमाचे पालन न केल्याने एकूण ५ दुकानांवर कारवाई करून त्यांच्याकडून ५००० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. ११ दुचाकी चालक यांच्याकडून ११००० रुपये दंड तर २ चारचाकी चालक यांच्याकडून २००० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.यामधे ३८ व्यक्ती, ६ दुकानदार, १३ वाहन चालक, असे एकूण ५७ जणांवर कारवाई करून ३८००० हजर रुपये दंड वसुल केलेला असून सदरची कारवाई ही चालूच राहणार आहे.
मुळशी तालुक्यात कोरोना रूग्णामध्ये सतत वाढ होत असून अनेक गावे सध्या हाँटस्पाँट बनलेली आहेत.नागरिकांनी मा. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे पालन सर्वांनी करावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी केलेले आहे.