पिरंगूट : कोरोनाचा वाढत असलेला प्रादूर्भाव रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या वीकएंड लाँकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पौड पोलिसांना घोटावडे फाटा आणि भुंगाव येथे नाकाबंदी केली आहे.
दिवसेंदिवस कोरोना रूग्ण संख्येत वाढ होत आहे. सोमवार ते शुक्रवार सकाळी सहा ते सायंकाळी सहा असे दुकानदार तसेच नागरिकांना खरेदी विक्री करण्यासाठी वेळ घालून दिली असून जमावबंदी तसेच राञी संचारबंदीची अटही यात घालण्यात आलेली आहे.परंतु वाढत असलेल्या कोरोनामुळे शासनाने शनिवार व रविवार पूर्णपणे लाँकडाऊन पुकरलेला आहे.
शनिवार व रविवार पुकारण्यात आलेल्या लाँकडाऊनचे मुळशी तालुक्यात काटेकोरपणे पालन होत असून जीवनावश्यक वस्तू सोडून सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेल्या आहे. पौड पोलिसांनीही भुगांव आणि घोटावडे फाटा येथे नाकाबंदी केली असून अत्यावश्यक कामासाठीच येथून वाहनाना प्रवेश देण्यात येत आहे.
मुळशी तालुक्यात कोरोना रूग्ण वाढत असून शनिवार तसेच रविवारी पूर्णपणे लाँकडाऊन पुकारण्यात आलेला आहे. गरज असल्यासच नागरिकांनी घरातून बाहेर पडावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर यांनी केले आहे.