मुळशी : संत तुकाराम महाराज बीजेच्या शुभ मुहूर्तावर पौड पंचायत समिती गणातील ४५ वर्षावरील नागरिकांना मोफत कोविड-१९ लसीकरण करायला जाण्यासाठी अंकुशभाऊ मोरे युवा मंचाच्या वतीने बसची व्यवस्था करण्यात आली आहे. पौड पंचायत समितीतील २९ ग्रामपंचायत व वाड्या - वस्त्यावरील नागरिकांना माले प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आंबवणे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे लसीकरण करायला जाण्यासाठी पुढील दोन महिने हि बस व्यवस्था करण्यात आली आहे.
या बस वाहतूक व्यवस्थेचे शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, भोर वेल्हा मुळशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुनिल चांदेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती व विद्यमान पंचायत समिती सदस्य कोमल वाशिवले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष विनोद कंधारे,युवा नेते सुहास दगडे, आंबवणेचे सरपंच मच्छिंद्र कराळे, उपसरपंच काका मेहता, निवेचे सरपंच सुनिल गाऊडसे, युवा नेते गणेश वाशिवले, पोलिस पाटील गणेश दळवी, पौड गण राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष विलास हुंडारे,निवे तंटामुक्ती अध्यक्ष शंकर मराठे, निवेचे पोलिस पाटील गणेश निवेकर, डॉ. पवार,डॉ. संभाजी सातपुते, लक्ष्मण कोंढेकर, नवनाथ दळवी, गणेश वांळज, गणेश मानकर, निवे ग्रामपंचायत सदस्य रुपाली गोरे, सामाजिक कार्यकर्ते भरत जगताप,रमेश शिंदे तसेच निवे व आंबवणे ग्रामस्थ उपस्थित होते .
पुढील दोन महिने चालणाऱ्या या मोफत बस वाहतूक व्यवस्थेसाठी अंदाजे अडीच ते तीन लाख रूपये खर्च येणार असून हा खर्च राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अंकुश मोरे यांनी उचलला आहे. माञ हा खर्च मोठा आहे असे लक्ष्यात आल्यानंतर येणाऱ्या खर्चास राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे २५०००/- , जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर २५०००/-,भोर वेल्हा मुळशी राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष सुनिल चांदेरे १००००/-, आंबवणेचे सरपंच मच्छिंद्र कराळे २१०००/- रुपयांची मदत करत या वाहतूक व्यवस्थेला हातभार लावला आहे.
पौड पंचायत समिती गणात २९ ग्रामपंचायत तसेच वाड्या वस्त्यावरील ४५ वर्षापुढील नागरिकांना कोविड - १९ चा पहिला लस घेण्यासाठी हि मोफत बस व्यवस्था करण्यात आलेली आहे.या भागात धरण परिसर असल्याने काही ठिकाणी वाहतूकीस अडथळा येतो. पुढील दोन ते तीन महिने हि बस व्यवस्था पुरविण्यात येणार असून कोविड १९ दुसऱ्या लससाठीही व्यवस्था पुरविण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.
अंकुश मोरे
माजी सरपंच,ग्रामपंचायत निवे
कार्याध्यक्ष,मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी