logo
add image
add image
Blog single photo

रिंगरोडसाठी व्हिडीओ कँमेय्राव्दारे मोजणी : उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांची माहिती


पिरंगूट : रिंगरोडसाठी संपादित होणाऱ्या क्षेत्राची व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे मोजणी होऊन सद्यस्थितीत असलेल्या पीकानुसार मोबदला दिला जाईल तसेच एकूण क्षेत्रापैकी जेवढे क्षेत्र रोडसाठी लागणार आहे तेवढंच क्षेत्र संपादित केले जाणार असल्याची माहिती मावळ - मुळशीचे उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांनी दिली.

        मुळशी तालुक्यातून जात असलेल्या रिंगरोड संदर्भात अंबडवेटमध्ये उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के आणि तहसिलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत लोक जागृती व समुपदेशन करणेकरिता शेतकऱ्यांची बैठक नुकतीच पार पडली. यावेळी उपअधिक्षक भूमीअभिलेख यांच्या समवेत भरे आणि अबंडवेट येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के म्हणाले की, संपादित होणाऱ्या क्षेत्राची व्हिडिओ कॅमेऱ्याद्वारे मोजणी होऊन सद्यस्थितीत असलेल्या पीकानुसार मोबदला दिला जाईल.संबंधीत जागेतील बांधकामाचे मुल्यांकन पीडब्लूडी विभाग करतील तसेच झाडांचे मुल्यांकन कृषी विभाग करेल. 

प्रस्तावित रिंगरोडच्या दोन्ही बाजूला गाव,वाडी,वस्ती आल्या तर ये - जा करणेसाठी अंडरपास व्यवस्था केली जाईल. वाहतुकीसाठी रस्त्याच्या दोन्ही बाजुने ४ मीचे  सर्विस रोड असणार आहेत.जे क्षेत्र सामाईक आहेत किंवा वाटप झालेल नाही अशा प्रकरणात प्रतिज्ञापत्र घेऊन हिश्याप्रमाणे हिंदुवारसा कायद्याप्रमाणे प्रक्रिया करणार. वाद असतील तर त्या सर्व जणांना एकत्र घेऊन त्यावर मार्ग काढण्यात येईल.

add image
add image

Leave Comments

Top