पिरंगूट : कासारआंबोली येथे साकारत असलेल्या कुस्ती आखाड्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे प्रतिपादन मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर यांनी केले.
कासारआंबोली ग्रामपंचायतच्या जागेत भव्य असा कुस्ती आखाडा तयार करण्यात येणार आहे. त्याचे भुमीपुजन सभापती पांडुरंग ओझरकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक सुनील वाडकर,जिल्हा परिषद सदस्य अंजली कांबळे, शिवसेना नेते नानासाहेब शिंदे, रामभाऊ गायकवाड, कासारआंबोलीचे सरपंच सचिन धुमाळ, उपसरपंच स्वप्निल शिंदे,कासारआंबोली ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा मारणे,उमेश सुतार, रंजित गायकवाड, शंकर सुतार, रेश्मा गायकवाड, प्रिती शिंदे, माधुरी धुमाळ,छाया भिलारे,पुजा सुतार, माजी सरपंच राजेंद्र मारणे,माजी सरपंच श्रद्धाली सुतार,समिर शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस मिडीया सेलचे सतिश सुतार, प्रदिप सुतार,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भोर विधानसभा अध्यक्ष सागर धुमाळ, सुनील शिंदे, संतोष शिंदे, महेश मानकर,शेखर शिंदे, बाळासाहेब शिंदे, भीमराव धुमाळ, मारूती वाडकर, अरूण शिंदे,विठ्ठल धुमाळ तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.