logo
add image
add image
Blog single photo

जामगांव ते पिरंगूट घाट रस्ता दुचाकी चालकांसाठी धोकादायक


पौड : पुणे - दिघी बंदर रस्त्याचे सुरू असलेल्या कामामुळे जामगांव ते पिरंगूट घाट दरम्यान मुख्य रस्त्यावर डंपर मधून सतत खडी पडत असल्याने हा रस्ता दुचाकी चालकांसाठी धोकादायक झाला आहे.अनेक दुचाकी चालक या खडीवरून घसरून पडून जखमी झालेले आहेत.

       सध्या पौड ते धनवेवाडी आणि पिरंगूट घाट येथे सिमेंट काँक्रीटीकरण असलेल्या रस्त्याचे काम जोरात सुरू आहे. येथे लागणारे सिमेंट काँक्रीटीकरणाचे साहित्य जामगांव येथील मे.रोडवेज सोल्युशन कंपनी या ठिकाणाहून नेले जाते. माञ हे नेले जाणारे साहित्य ज्या डंपर मध्ये नेले जाते ते डंपर निकृष्ट दर्जाचे असून वेगाने जात असतात. यामुळे सिंमेट काँक्रीटीकरण केलेली खडी जामगांव ते पिरंगूट घाटा दरम्यान सर्व मुख्य रस्त्यावर पडलेली दिसत आहे.

        शेरे, बावीस मैल, पौड पोलिस स्टेशन, पौड बसस्थानक, सुतारवाडी, शिंदेवाडी,घोटावडे फाटा,पिरंगूट येथे मोठ्या प्रमाणावर हि खडी रस्त्यावर पडलेली असून रोडवेज कंपनीकडून या पडलेल्या खडीकडे दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे वेगात असलेले अनेक दुचाकीचालक या खडीवरून घसरून पडत असुन रस्त्यावर पडलेली हि धोकादायक झालेली असून ही खडी कोण उचलणार हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

दुचाकी चालकांनो आपली वाहन सवकाश चालवा.

मुळशी आणि कोळवण भागातून पिरंगूट परिसरात कामाला जाणाऱ्याची संख्या मोठी आहे. हे सर्व दुचाकीवरुनच कामाला किंवा पुण्यात कामानिमित्त जात असतात. पौड बसस्थानक तसेच पौड पोलिस स्टेशन समोरील वळणावर सध्या ही खडी पडलेली खडी दिसुन येत नसून यावरून दुचाकी घसरत आहेत.पौड येथील हाँटेल दिपक समोरील वळणावर दहा दिवसांपूर्वीच एका दुचाकीचालक युवकाचा आपघाती मृत्यू झाला.तरी याभागातील दुचाकीचालकांनी आपली वाहने सवकाश चालविणे गरजेचे आहे.

add image
add image

Leave Comments

Top