पौड : मुळशी तालुक्यात राञी दहा नंतर पिरंगूट - भुगांव परिसरात सुरू असणाऱ्या ५ हाँटेलावर कारवाई करण्यात आली असून विना मास्क फिरणाय्रा १५० जणांकडून ३० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली आहे.
राज्यात सर्वञ कोरोनाचा कहर वाढतच असून दररोज अनेक रूग्ण कोरोना ग्रस्त होताना दिसत आहे. शासनाने घालून दिलेले नियम अनेक जणांकडून पायदळी तुटविले जात आहेत. यावर पौड पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत असून मुळशी तालुक्यात दहा नंतर सुरू असणाऱ्या ५ हाँटेलावर कारवाई करण्यात आली असून विना मास्क फिरणाय्रा १५० जणांकडून ३० हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, पोलिस नाईक जय पवार, पोलिस काँन्सटेबल तुषार भोईटे, गणेश सांळुके यांनी केल्या.
राञी दहा ते सकाळी सहा यावेळेत संचारबदी असून दुकानदारांनी आपली दुकाने वेळेत बंद करावीत. वेळेत दुकाने बंद न करणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील तसेच न ऐकणाय्रांची दुकाने सील केली जातील अशी माहिती पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी दिली.