logo
add image
add image
Blog single photo

मुळशीत पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात : जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांची मागणी


मुळशी : पुणे शहराला मुळशी तालुका अधिक जवळ असल्याने तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या प्रंचड आहे.तालुक्यात वनसंपदा, नद्या ,धरणे, किल्ले, डोंगररांगा, घाट परिसर ,विविध देवस्थाने,हॉटेल्स, भव्य गृहप्रकल्प यामुळे शहरी पर्यटक या ठिकाणी आकर्षित होतात .परंतु येणाऱ्या पर्यटकांना पुरेशा सोयी सुविधा नसल्याने त्यांची अनेकदा गैरसोय होते . मुळशी तालुक्यातील पर्यटन स्थळांच्या ठिकाणी डिंभे धरण परिसराप्रमाणे आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात याबाबत पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी बारामती मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन दिले आहे.

     या दिलेल्या निवेदनामध्ये अमित कंधारे यांनी तालुक्यात करावयाची विविध कामे पुढीलप्रमाणे सुचविण्यात आली आहेत. 

१)  डोंगरवाडी , निवे आणि वांद्रे हद्दीत असलेल्या प्लस व्हॅली परिसरात व्हॅली क्रासिंग , राक क्लायबिंगची सुविधा सुरू करावी. 

२ ) मुळशी व टेमघर धरणाच्या बॅक वाटरमध्ये जलक्रीडा सुविधा उपलब्ध करावी 

३ ) मुळशी धरणात स्थानिकांना मासेमारीची परवानगी द्यावी व येथे डिंभे धरणाच्या परिसरात शाश्वत संस्थेमार्फत सुरू असलेल्या मत्स्यपालनचा व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी . 

४) ताम्हिणी अभयारण्याच्या परिसरात वन खात्याच्या मदतीने काही पॉइंट ठरवून त्यासाठी निसर्ग भटकंतीची ( जंगल ट्रेक ) योजना राबविण्यात यावी . उदा . मे महिन्याच्या अखेरीस या परिसरात दिसणारे काजवे पाहण्यासाठी हाँसे पर्यटक येतात धामणओहळ परिसरातील शेकरू अद्याप दुर्लक्षित आहे .

 ५ ) पळसे - ताम्हिणी आदी परिसरात येणाऱ्या पर्यटकांसाठी निवासाची शासकीय व्यवस्था करावी ,

६) मुळशी धरणाच्या पायथ्याला किंवा धरणाच्या बॅक वाटर परिसरात पैठणच्या धर्तीवर गाईन तयार करावे . 

७) मुळशीतील कोराईगड , तिकोणा , तैलबैला , वडुस्ते येथील किल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करावा ,

 ८)मुळा व मुठा नदीवर रिव्हर राफ्टींगची सोय करावी .

 ९) मुळशीतील शेरे , पळसे , भालगुडी , ताम्हिणी . येथील देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा .

 १०) माले येथील मुळशी सत्याग्रहाच्या लढ्याचे संग्रहालय उभारावे

      निसर्ग सौदर्याने नटलेल्या मुळशीत पर्यटन व्यवसायाला खूप मोठी संधी आहे. मुळशी, टेमघर, वरसगाव या सारखी मोठी धरणे व त्याभोवती असलेली समृद्ध जैवविविधता, ताम्हिणी अभयारण्य,किल्ले, मुळा, मुठा नद्यांचा हिरवागार परिसर यामुळे शहरातील पर्यटक मुळशीकडे नेहमीच आकर्षित होतो. परंतु या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांकरिता आवश्यक त्या सुविधा व सुरक्षितता मिळत नसल्याने त्यांची गैरसोय होते. तालुक्यातील मुख्य मार्ग व अंतर्गत रस्ते खराब असल्याने वाहनचालकांना त्रास सहन करावा लागतो. पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या सोयी झाल्या तर त्या माध्यमातून तालुक्यातील तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीचा सदस्य या नात्याने मी खासदार सुप्रिया सुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडे पाठपुरावा करीत आहे. अशी माहिती जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी दिली.

       मुळशीतील पर्यटन वाढीसाठी आवश्यक त्या सोयी सुविधा निर्माण करण्याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून सूचना आलेल्या आहेत. या सुविधांच्या पुर्ततेकरिता आम्ही प्रशासन स्तरावर नियोजन करत आहोत. असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

       मुळशी तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून तिचे जतन व संवर्धन होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या वनसम्पदेच्या माध्यमाने पर्यटन वाढीसही चालना मिळायला हवी. त्याकरिता येथील जैवविविधतेला बाधा न येता पर्यटकांना पर्यटनाचा आनंद कसा घेता येईल यासाठी सोयी सुविधा कशा पुरविता येतील याबाबत स्थानिक नागरिकांच्या मागणीचा विचार करून वनखात्याच्या माध्यमाने शासनाकडे प्रस्ताव पाठवले जाणार आहेत असे उपवनसंरक्षक राहुल पाटील सांगितले.


add image
add image

Leave Comments

Top