logo
add image
add image
Blog single photo

सुतारवाडी येथे कातकरी आदिवासी भगिनी समवेत महिला दिन उत्साहात साजरा


पौड : सुतारवाडी येथील गणेशनगर मध्ये आदिवासी कातकरी भगिनीसाठी पहिल्यांदाच अनोख्या पद्धतीने महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

        महिलादिनाचे निमित्ताने आदिवासी कातकरी समाजातील महिलासाठी मनोरंजन , खेळाच्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते तसेच बचतगटाविषयीही त्यांना माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत सदस्य छाया संजय भिलारे,ग्रामपंचायत सदस्य नेहा गणेश सुतार , ग्रामपंचायत सदस्य पुजा चेतन सुतार , मनिषा शंकर सुतार, रूपाली स्वप्निल कांबळे यांनी केले होते.

विजयी स्पर्धक पुढीलप्रमाणे :

संगीतखुर्ची प्रथम : सुवर्णा जाधव

रॅम्प वाॅक प्रथम क्रमांक : दिपाली कोळी 

तळ्यात मळ्यात प्रथम क्रमांक : सुनिता जाधव

add image
add image

Leave Comments

Top