पौड : महिला दिनानिमित्त इतर क्षेत्रातील महिलाचे योगदान महत्त्वाचे आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांच्या कलागुणांवर प्रकाश टाकण्यात येतो.आशा वर्कर यांचे काम मोठे आहे. कोरोना काळात त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली.गावात आजारी असणाऱ्याची शोध मोहिम घेतली. स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता कोरोनाचा फैलाव होण्यापासून गावाला रोखले. म्हणून कोरोना योध्दाचा सत्कार करणे महत्त्वाचे होते. व्यवसायाची परिसीमा आता बदलल्या आहेत. शहरे नागरीकरणाकडे करणाकडे वाटचाल करत आहेत. ब्युटी पार्लर, ज्वेलरीचे व्यवसाय भविष्यात चालणारे आसून महिला व मुलींना याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. ग्रामपंचायततीने करून दिलेल्या संधी फायदा महिलांनी करून घ्याणे गरजेचे असल्याचे मत मुळशी गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी पौड येथे व्यक्त केले.
जागतिक महिला दिननिमित्त महिलांसाठी मोफत कार्यशाळेचे आयोजन पौड ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी गटविकास अधिकारी संदीप जठार बोलत होते. यामध्ये ५ ते १८ वयोगटातील मुलींना स्वरक्षण व कराटे प्रात्यक्षिके, महिलासाठी कुकिंग कार्यशाळा, ब्युटिपार्लर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सहाय्यक गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर, आरोग्य अधिकारी डाँ.अजित कारंजकर, पौडचे सरपंच जगदीश लांडगे, विद्याभवन इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या सुचिञा साठे, डॉ. वायाळ सर, डाँ. विशाल जाधव, उपसरपंच रसिका जोशी, पौडचे पोलिस पाटील संजय पिंगळे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार, प्रशांत वाल्हेकर,अजय कडू, प्रकाश शिंदे, प्रिती आगनेन, नंदा नवले,मोनाली ढोरे, आशा जाधव, वंदना भोयणे,माजी ग्रामपंचायत सदस्य यशवंत पिंगळे, दिंगबरा प्रतिष्ठानचे संस्थापक संकेत दळवी, माजी सरपंच संपत दळवी,मुनीरभाई मुलाणी, मयूर मखी,अभिषेक वाचकवडे,संजय काँम्प्युटर्सच्या शुभांगी ठोंबरे, ग्रामसेवक विजय कदम उपस्थित होते.
आरोग्य अधिकारी डाँ.अजित कारंजकर यावेळी म्हणाले की, कोरोनाची लढाई अजून संपलेली नाही. ग्रामपंचायत कर्मचारी,अंगणवाडी ताई, आशा वर्कर यांनी पौडमध्ये चांगले काम केले आहे. नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे सोशल डिस्टसिंग ठेवणेहि गरजेचे आहे.
कोरोना काळात पौडमध्ये काम करणाऱ्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा यावेळी कोरोना योध्दा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूञसंचलन विस्तार अधिकारी मधुकर येनपुरे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार यांनी मानले.