logo
add image
add image
Blog single photo

बावधनमध्ये अनोख्या पद्धतीने महिलादिन साजरा


बावधन: जागतिक महिला दिनानिमित्त बावधन येथे गावचे विद्यमान  उपसरपंच दिपकभाऊ दगडे पाटील यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यांत ९२ नागरिकांनी रक्तदान केले. या शिबिराचे आयोजन सिम्बॉयसिस विद्यापीठ हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात आले होते.

यावेळी पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजितदादा शिवतारे यांच्या हस्ते रक्तदान शिबिराची सुरुवात करुन रक्त दान करणाऱ्या लोकांना प्रमाणपत्र देण्यात आले. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळशी तालुका अध्यक्ष महादेव आण्णा कोंढरे, तानाजी आण्णा दगडे, मा. सभापती राधिकाताई कोंढरे, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक  दिलीपआण्णा दगडे, मा. उपसरपंच गणेश दगडे, मनोज आप्पा दगडे, उद्योजक राजाभाऊ दगडे, मा. उपसरपंच अमोल दगडे, मा. उपसरपंच तुषार दगडे, मा. उपसरपंच रंजना दगडे, मा.उपसरपंच रेश्माताई खिलारे, दलित पँथर अध्यक्ष विशाल खिलारे, भाऊसाहेब दगडे, अशोक दगडे, मंदार घुले आदी मान्यवर व युवा वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

"महिलांचा सन्मान, आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी महिला दिवस आणि जागतिक महिला दिवस साजर केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधत कोरोनाच्या काळात काहितरी कार्यक्रम घेण्याएवजी रक्तदान शिबीर या सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते."

-मा. श्री दिपक दगडे पाटील(विद्यमान उपसरपंच, बावधन)

add image
add image

Leave Comments

Top