logo
add image
add image
Blog single photo

घरातून रागात निघून गेलेला आठ वर्षीय मुलगा पौड पोलिसांमुळे सुखरूप


पौड : भावाशी झालेल्या भांडणामुळे आईने मारल्यानंतर घर सोडलेल्या आठ वर्षीय मुलाला पौड पोलिसांनी सतर्कता दाखवत आई वडीलांचा शोध घेत या मुलाला त्यांच्या स्वाधीन केला आहे.

      भुगांव ( ता.मुळशी ) येथील ऋषी सोमीण राजवंशी ( वय.८ वर्ष )  हा मुलगा राञी साडेअकराच्या दरम्यान भुगावमध्ये फिरताना एका हाँटेल चालकास दिसला. या हाँटेलचालकाने या घटनेची माहिती पौड पोलिसांना दिली. राञी फिरणाय्रा पोलिस पथकाने या मुलाला पौड पोलिस स्टेशनला आणले. भुगावच्या बिट अमंलदार अनिता रवळेकर यांनी या मुलाला विश्वास घेतले व त्याच्या कडून माहिती घेतली असता. लहान भावाशी भांडण झाल्यामुळे आईने मला मारले. रागाच्या भरात घर सोडले असल्याचे या मुलाने बीट अमंलदार अनिता रवळेकर यांना सांगितले. 

        यानंतर पोलिसांनी या मुलाला भुगाव येथील शाळेपाशी आणले व येथून पुढे कुठे राहतो हा मार्ग पोलिसांना दाखविला. घर सोडून गेलेल्या या मुलाचे घर सापडल्यानंतर राञी रागाच्या भरात निघून गेलेल्या मुलाला पोलिसांनी आई - वडीलाच्या ताब्यात दिले. पोलिसांमुळे मुलगा घरी यामुळे आनंदीत झालेल्या आई - वडीलांनी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ व भुगांवच्या बीट अमंलदार अनिता रवळेकर यांचे आभार मानले.

add image
add image

Leave Comments

Top